विमाप्र प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती
योजनेचा प्रकार
:शैक्षणिक
लाभार्थी
- शिक्षणासाठी आर्थिक मदत देणे.
- उच्च शिक्षणासाठी आवड निर्माण करणे.
- विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात जाण्याची संधी देणे
- पारदर्शकता, समन्वय आणि विलंब टाळण्यासाठी शिष्यवृत्ती योजना.
- फक्त विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना या योजने अंतर्गत शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा लाभ दिला जातो.
लाभ
पात्र विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांना खालीलप्रमाणे देखभाल भत्ते प्रदान केलेलं जातात :
- अर्जदाराने गट अ निवडल्यास – होस्टेलर रु. ४२५/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ब निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट क निवडल्यास – होस्टेलर रु. २९०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ड निवडल्यास – होस्टेलर रु. २३०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. १२०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- अर्जदाराने गट ई निवडल्यास – होस्टेलर रु. १५०/- दरमहा आणि डे स्कॉलर रु. ९०/- दरमहा (कालावधी – प्रवेशाच्या तारखेपासून ते परीक्षेच्या तारखेपर्यंत)
- शासकीय / अनुदानित / विना- अनुदानित संस्थेतून व्यावसायिक अभ्यासक्रम आणि बिगर-व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता यांचा १००% लाभ मिळतो.
- वसतिगृहात प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना एकूण शुल्क रक्कमेच्या फक्त एक तृतीयांश रक्कमेचा लाभ प्राप्त होईल.
- बी.एड आणि डी.एड अभ्यासक्रमांसाठी : या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना १००% लाभ प्रदान करण्यात येईल. (शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क आणि देखभाल भत्ता). अनुदानित, विना अनुदानित संस्थेतून डी.एड आणि बी.एड अभ्यासक्रम शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संबंधित अभ्यासक्रमासाठी शासकीय नियमानुसार असलेले शुल्क संरचनेप्रमाणे शुल्क परतावा प्रदान करण्यात येईल.
टीप: अर्जदाराने कोणत्याही महिन्याच्या २० तारखेपर्यंत प्रवेश घेतला असेल, तरच त्याला त्या महिन्याचा देखभाल भत्ता प्रदान केला जाईल. अन्यथा देखभाल भत्ता पुढील महिन्यापासून अनुज्ञेय राहील.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वर नमूद केल्याप्रमाणे