बंद

    विजाभज प्रवर्गासाठी प्राथमिक/ माध्यमिक/ उच्च माध्यमिक निवासी आश्रमशाळा योजना

    • तारीख : 01/01/1954 -
    • क्षेत्र: शैक्षणिक

    लाभ:

    इयत्ता १ ली ते ४ थी किंवा १ ली ते ७ वी प्राथमिक शाळा, ५ वी ते १० वी किंवा ८ वी ते १० वी या माध्यमिक आणि ११ वी ते १२ वी या उच्च माध्यमिक आश्रम शाळा असे हया निवासी शाळांचे स्वरुप आहे.

    • प्रवेशित निवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहीत्य, पुस्तके व गणवेश, भोजनाची भांडी, अंथरुण-पांघरुण, क्रीडा साहित्य, आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात.
    • आश्रमशाळा चालविणा-या संस्थेस शासन मान्यता मिळाल्यानंतर खालील बाबीवर अनुदान अनुज्ञेय आहे:

      1. वेतन: नियमित वेतन अदा करण्यात येते.
      2. परिपोषण अनुदान: दरडोई दरमहा मान्य निवासी विद्यार्थ्यांसाठी रु. 2200/- प्रमाणे परिपोषण खर्चासाठी.
      3. आश्रमशाळेतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचार्यांना देय होणाऱ्या पाचवा व सहावा वेतन आयोगानुसार देय होणाऱ्या वेतनाच्या ८% व १२% इतके अनुदान आकस्मिक खर्च म्हणून प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळाना खर्चा साठी देण्यात येते.
      4. वेतनेतर अनुदाना व्यतिरिक्त आश्रमशाळांतील प्रामुख्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा विचारात घेऊन त्यांना आधुनिक पध्दतीचे शिक्षण देण्यासाठी विज्ञान प्रयोगशाळेसाठी साहित्य, शैक्षणिक साहित्य, गरम पाण्यासाठी सोलर यंत्रणा, संगणक साहित्य, भाषाविषयक पुरक साहित्य, गणित प्रयोगशाळा साहित्य, व्हर्चुअल क्लासरुम, आश्रमशाळेचे संगणीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्यासाठी यंत्र इ. आवश्यक मुलभूत सोईसुविधा (2225 ई 875 21-पुरवठा व सामग्री) या लेखाशिर्षाखाली गरजू संस्थांना शासनामार्फत पुरविण्यात येतात.

      लाभार्थी:

      १) विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावे . २) विद्यार्थी विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्गातील असावे .

      फायदे:

      वर नमूद केल्याप्रमाणे

      अर्ज कसा करावा

      संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग