बंद

    वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    पायाभूत सुविधा

    लाभार्थी

    संबंधीत तांडा/ वस्ती मधील विकास कामांचा जिल्हास्तरावरील पंचवार्षिक आराखड्यामध्ये समाविष्ट असणे आवश्यक आहे. सदरहू पंचवार्षिक आराखड्यात समाविष्ट असलेल्या कामांमधून जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील समितीमार्फत निवड केलेल्या कामांचा प्रस्ताव जिल्हास्तरीय समितीमार्फत प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याकरीता शासनास सादर केला जातो. सदरहू कामांना निधीच्या उपलब्धतेनुसार प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्यात येतो.

    लाभ

    1. सदर योजनेंतर्गत तांडा / वस्तीमध्ये पुढील विकास कामे हाती घेण्यात येतात-
    2. विद्युतीकरण ,पिण्याचे पाणी, अंतर्गत रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये ,संत रामराव महाराज सभागृह/समाज मंदिर ,वाचनालये व शक्य असेल तेथे मुख्य रस्त्याला जोडणाऱ्या पोहोच रस्त्यांची कामे हाती घेण्यात येतात.

    3. सदर योजनेतंर्गत तांडा/ वस्ती यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात निधी विकास कामांकरीता देण्यात येतो.
    अ.क्र. लोकसंख्या अनुदान
    1 51 ते 100 पर्यंत रू.15 लक्ष
    2 101 ते 150 रू.20 लक्ष
    3 151 ते 300 रू.25 लक्ष

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग