बंद

    राज्यातून व विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी च्या परिक्षेत प्रथम येणाऱ्या विमुक्त जाती व भटक्या समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना स्व. वसंतराव नाईक पुरस्कार

    • तारीख : 04/03/2017 -
    • क्षेत्र: शैक्षणिक, पुरस्कार

    लाभार्थी

    1. विद्यार्थी/विद्यार्थिंनी विमुक्त जाती किंवा भटक्या जमातीतील असावा.
    2. विद्यार्थी/विद्यार्थिंनी राज्यातून/बोर्डातून विजाभज प्रवर्गातून सर्वप्रथम आलेला असावा.
    3. राज्यस्तरावर व बोर्डात प्रथम आलेला विजाभज प्रवर्गातील मुलगा व मुलगी दोघांनाही पुरस्कार देण्यात येईल.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    विजाभज प्रवर्गातून इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेमध्ये राज्यात सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी वा विद्यार्थीनीला प्रत्येकी रु.1.00 लाख आणि इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेमध्ये विभागीय परीक्षामंडळातून सर्व प्रथम आलेल्या प्रत्येकी विद्यार्थी वा विद्यार्थीनीला रु.51 हजार इतक्या रकमेचा पुरस्कार देण्यात येतो.

    अर्ज कसा करावा

    संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे