मार्जिन मनी योजना
योजनेचा प्रकार
:गोवारी समाज योजना , आर्थिक , स्वयंरोजगार
लाभार्थी
- सदर योजनेचा लाभ स्टँड अप इंडिया योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या राज्यातील “गोवारी” या समाजातील सवलतीस पात्र लाभार्थ्यांना देण्यात येईल.
- संबंधित लाभार्थ्यांनी सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण यांचेकडे अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजूरीचे पत्र जोडणे आवश्यक आहे.
लाभ
“गोवारी” या समाजातील सवलती घेण्यास पात्र असलेला नवउद्योजक यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया योजनेअंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरीत फ्रंट एंड सबसिडी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक ,इतर मागास बहुजन कल्याण