पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना
सुरुवात / सद्यस्थिती
२०१९ नाशिक येथील वसतिगृहाच्या बांधकामास प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली असून बांधकाम सद्यस्थितीत सुरु आहे.
धनगर समाज योजना
लाभार्थी
- विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
- या वसतिगृहामध्ये इयत्ता ११ वी पासून पुढील शिक्षणासाठी प्रवेश देण्यात येईल.
- धनगर समाजच्या विद्यार्थ्यांना ५० % आरक्षण व उर्वरित जागांवर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल.
- व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी संबंधित प्रवर्गासाठी राखीव असलेल्या जागातून ५० टक्के जागा राखून ठेवण्यात येतील, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी राखीव जागांवर गुणवत्तेनुसार त्या संबंधित प्रवगीतील विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येतील.
- विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये १.०० लाखापेक्षा कमी असावे.
लाभ
- सदर वसतिगृहातील मुला-मुलींकरीता टेबल-खुर्ची, पुस्तके व वहया इ. साहित्य ठेवण्यासाठी कपाट तसेच कॉट, गादी, उशी, आंधरुण, पांघरुण, बेडशीट, ब्लॅकेट इ. सुविधा पुरविण्यात येतील
- एकविसाव्या शतकातील स्पर्धात्मक युगास सामारे जाण्यासाठी मुला मुलीच्या वसतिगृहांमध्ये संगणक लॅब, वाय-फाय सुविधा, अभ्यासिका व स्पर्धा परिक्षा केंद्र, विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक गुणांचा विकास होणेसाठी व कौशल्य विकासासाठी विशेष मार्गदर्शनासाठी स्वतंत्र हॉल इ.व्यवस्था/सुविधा या वसतिगृहांमध्ये पुरविण्यात येतील
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग