बंद

    पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर घरकुल योजना

    • तारीख : 01/01/2023 - 01/01/2024

    घरकुल योजना

    लाभार्थी

    1. लाभार्थी धनगर समाज असावा,
    2. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र,
    3. लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखापेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
    4. अल्पभूधारक असल्याबाबत सक्षम प्राधिकाऱ्याचे प्रमाणपत्र,
    5. महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र,
    6. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र.

    लाभ

    1. या योजनेंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.1.20 लक्ष व डोंगराळ/दुर्गम भागासाठी प्रति घरकुल रु.1.30 लक्ष निधी लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिला जातो.
    2. सदरहू योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये पुढील घटकांना प्राधान्य देण्यात येते-
    • पालात राहणारे,
    • दारिद्र्य रेषेखालील कुटूंब,
    • विधवा, परित्यक्त्या किंवा अपंग महिला,
    • पूरग्रस्त क्षेत्र,
    • विधवा/ विधुर/ अपंग/ अनाथ/ परितक्त्या/ वयोवृद्ध.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    वरील विभागाशी संपर्क साधा