बंद

    ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना

    • तारीख : 01/01/2025 -

    लाभार्थी

    1. विद्यार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा
    2. उच्च शिक्षण घेणाऱ्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेले इतर मागास वर्ग , विमुक्त जाती , भटक्या जमाती (ब व ड ) व विशेष मागास प्रवर्गाचे पात्र विद्यार्थी
    3. १२ वी मध्ये किमान ६० % गुण मिळालेले विद्यार्थी
    4. विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न रुपये 2.50 लाखापेक्षा कमी असावे.
    5. लाभार्थी संख्या : प्रती जिल्हा ६०० याप्रमाणे ३६ जिल्ह्यात २१६०० च्या मर्यादेत

    लाभ

    विद्यार्थ्यांना भोजन, निवास व इतर साहित्य उपलब्ध करुन घेण्यासाठी विद्यार्थ्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम खालीलप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे.
    मुंबई शहर, मुंबई उपनगर, नवी मुंबई, ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड, नागपूर या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये
    60,000/-
    इतर महसुली विभागीय शहरांतील उर्वरित क वर्ग महानगरपालिका क्षेत्रामध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये
    51,000/-
    इतर जिल्हयाच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये
    43,000/-
    तालूक्यांच्या ठिकाणी उच्च शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांसाठी वार्षिक रुपये
    38,000/-

    या संकेतस्थळावर अर्ज करावा.
    hmas.mahait.org

    संबंधित जिल्ह्याचे सहायक संचालक , इतर मागास बहुजन कल्याण विभाग



    इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी “ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना” लागू करण्याबाबत.[पीडीएफ 319 केबी ]

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित विभागाशी संपर्क साधा