महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे
राज्यातील ज्या खुल्या प्रवर्गातील जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था/ महामंडळामार्फत योजनांचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक-युवती व इतर उमेदवारंसाठी विविध उपक्रम, कार्यक्रम इत्यादी राबविण्यात येवून व इतर माध्यमातूनही विद्यार्थी, युवक-युवती इत्यांदीचा विकास घडविण्यासाठी महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) (AMRUT) या नावाने नवीन स्वायत्त संस्था दि.22.08.2019 च्या शासन निर्णयान्वये स्थापन करण्यात आलेली आहे.
उद्दिष्टे
- UPSC व MPSC च्या मुख्य परीक्षा / मुलाखतीच्या तयारीसाठी उमेदवारांना अर्थसहाय्य करणे,
- खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील युवक, युवती यांना लघुउद्योग प्रशिक्षण कार्यक्रम, स्वंयरोजगार प्रोत्साहन व प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे
- कृषी उत्पन्न आधारित उद्योग सुरू करण्यासाठी प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे इ.