बंद

    संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ

    प्रस्तावना

    नाभिक समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळाची (उपकंपनी) स्थापन करण्याबाबत दिनांक 07.12.2023 रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, दिनांक 05.01.2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार नाभिक समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी संत सेनाजी महाराज केशशिल्पी महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.

    उपकंपनीची रचना
    अ. क्र. पदनाम / माहिती भूमिका
    1 मा. मंत्री, इतर मागास बहुजन कल्याण पदसिध्द अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी उपाध्यक्ष
    3 सह सचिव / उप सचिव, इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई संचालक
    4 संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे संचालक
    5 सहकार आयुक्त व निबंधक, पुणे संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, नवी दिल्ली संचालक
    7 व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ, मुंबई संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    8 अशासकीय सदस्य – 3 संचालक

    उपकंपनीचे कार्य:

    1. नाभिक समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
    2. नाभिक समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे.
    3. नाभिक समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
    4. नाभिक समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
    5. नाभिक समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे आणि त्यांना चालना देणे व योजनासाठी अहवाल तयार करणे.
    6. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या योजना राबविणे.
      • वेबसाइट दुवा : https://ssmkm.maharashtra.gov.in
      • दूरध्वनी : 02225275374
      • ईमेल : homsobcfdc[at]gmail[dot]com
      • पत्ता : प्रशासकीय भवन, 4 था मजला, रामकृष्ण चेंबूरकर मार्ग, चेंबूर,मुंबई-400071