बंद

    श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ

    प्रस्तावना

    गवळी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणूनश्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळा ची (उपकंपनी) स्थापन करण्याबाबत दिनांक 10.10.204 रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, दिनांक 04.03.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार गवळी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.

    उपकंपनीची रचना
    अनुक्रमांक पद भूमिका
    1 मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) पदसिद्ध अध्यक्ष
    2 शासन नियुक्त पदाधिकारी
    वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष
    उपाध्यक्ष
    3 अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव
    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
    संचालक
    4 सह सचिव / उप सचिव
    इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई
    संचालक
    5 संचालक
    इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे
    संचालक
    6 व्यवस्थापकीय संचालक
    वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ मर्या., मुंबई
    संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक
    7 अशासकीय सदस्य – 3 संचालक
    • वेबसाइट दुवा : https://kavmu.maharashtra.gov.in
    • दूरध्वनी : 02226202588
    • ईमेल : vnvjntdc[at]gmail[dot]com
    • पत्ता : जुहू सुप्रिम शॉपिंग सेंटर, गुलमोहर क्रॉस रोड नं.09,जे.व्ही.डी.पी. स्कीम, विले पार्ले (पश्चिम), मुंबई-400 049