बंद

    महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर

    राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गाकरीता शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक विकासासाठी विविध संशोधन व प्रशिक्षण प्रकल्प, कार्यक्रम तसेच उपक्रम राबविण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर या स्वायत्त संस्थेची स्थापना दि.08.08.2019 च्या शासन निर्णयान्वये करण्यात आलेली आहे.

    उद्दिष्टे

    1. इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती-भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग तसेच समाजातील इतर वंचित आणि दुर्लक्षित घटकांतील व्यक्ती /कुटुंबांच्या महाज्योती किंवा शासनाने ठरविलेल्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकासाशी निगडीत समस्यांचा समजावून घेऊन अभ्यास करणे व त्यावरील उपाय शासनास सुचविणे.
    2. विविध सर्वेक्षण, संशोधन व कृती संशोधन, मुल्यमापन करणे; रोजगाराकरिता कौशल्य विकास व क्षमता वृद्धी प्रशिक्षण, स्वयंरोजगार, उद्योजकता, औद्योगिक घटकासहित कृषी औद्योगिक घटक निर्मिती व विकास करणे;
    3. रोजगार, विविध स्पर्धा परीक्षा, करिअर विकास इत्यादी करिता प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे; लाभार्थी घटकाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नती करिता विविध पुरस्कार, विद्यावेतन, स्कॉलरशिप, अधिछात्रवृत्ती निर्माण व प्रदान करणे.
      • वेबसाइट दुवा : http://www.mahajyoti.org.in
      • दूरध्वनी : 07122870121
      • पत्ता : डॉ. बाबसाहेब आंबेडकर, सामाजिक न्याय भवन, दुसरा माळा, दीक्षाभूमी रोड, श्रद्धानंद पेठ, नागपूर ४४००२२