बंद

    माध्यमिक शाळांमध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र प्रवर्गातील 5 वी ते 7 वी व 8वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापुर्व शिष्यवृत्ती (जिल्हा परिषद)

    • तारीख : 17/08/1995 - 15/08/2025

    सुरुवात

    शासन निर्णय सामाजिक न्याय विभाग , क्र. इबीसी 1094/प्र.क्र.109/मावक-2, दि. 17.08.1995
    सदर योजना सन 1995-96 पासून लागू करण्यात आली आहे.

    योजनेचा प्रकार

    शैक्षणिक

    लाभार्थी

    1. विद्यार्थी शासन मान्यताप्राप्त शाळेत शिकत असलेला असावा.
    2. विद्यार्थी गतवर्षाच्या इयत्ता ५ वी ते १० वी पर्यंतच्या वार्षिक परीक्षेत ५०% पेक्षा जास्त गुण घेऊन तो वर्गामध्ये प्रथम किंवा द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला असावा.
    3. विद्यार्थी विजाभज व विमाप्र या प्रवर्गातील असावा.

    लाभ

    1. इयत्ता ५ वी ते ७ वी दरमहा २० रुपयाप्रमाणे १० महिन्यांसाठी २०० रुपये.
    2. इयत्ता ८ वी ते १० वी दरमहा ४० रुपये प्रमाणे १० महिन्यांसाठी ४०० रुपये प्रतिविद्यार्थी

    कोणाकडे अर्ज करावा

    1. संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग
    2. संबंधित शाळेचे मुख्याध्यापक

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग