आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ
प्रस्तावना
आगरी समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी व आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्न करण्याकरिता महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळांतर्गत, उपकंपनी म्हणून आगरी समाज आर्थिक विकास महामंडळाची (उपकंपनी) स्थापन करण्याबाबत दिनांक 14.10.24 रोजी झालेल्या मा. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये निर्णय घेण्यात आला. त्यानुसार, दिनांक 04.03.2025 रोजीच्या शासन निर्णयानुसार आगरी समाजाच्या सामाजिक व आर्थिक विकासासाठी आगरी समाज आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास शासन मान्यता देण्यात आली. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्ग वित्त आणि विकास महामंडळाच्या नियंत्रणाखाली सदर उपकंपनीचे कामकाज चालविण्यात येईल.
अनुक्रमांक | पद | भूमिका |
---|---|---|
1 | मा. मंत्री (इतर मागास बहुजन कल्याण) | पदसिद्ध अध्यक्ष |
2 | शासन नियुक्त पदाधिकारी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई यांचे उपाध्यक्ष |
उपाध्यक्ष |
3 | अपर मुख्य सचिव / प्रधान सचिव / सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई |
संचालक |
4 | सहसचिव / उपसचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई |
संचालक |
5 | संचालक इतर मागास बहुजन कल्याण संचलनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे |
संचालक |
6 | व्यवस्थापकीय संचालक महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ मर्या., मुंबई |
संचालक तथा व्यवस्थापकीय संचालक |
7 | अशासकीय सदस्य – 3 | संचालक |
उपकंपनीचे कार्य
- राज्यातील आगरी समाजाच्या कल्याण व विकासासाठी काम करणे.
- आगरी समाजाच्या व्यक्तींना अल्प व्याज दराने स्वयंरोजगाराकरिता कर्ज उपलब्ध करुन देणे व त्याची वसूली करणे.
- आगरी समाजाची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी पतसाधने, साधनसामुग्री आणि तांत्रिक व व्यवस्थापकीय साधने पुरविणे.
- आगरी समाजासाठी कृषी उत्पादने, वस्तू, साहित्य आणि सामुग्री यांची निर्मिती, जुळवणी व पुरवठा यासाठी आवश्यक वाटतील अशा सेवा देणे.
- राज्यातील आगरी समाजाच्या कल्याणासाठी योजना सुरु करणे, त्यांना चालना देणे व योजनांसाठी अहवाल तयार करणे.
- महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाच्या धर्तीवर शासनाने मंजूरी दिलेल्या सर्व योजना राबविणे.