बंद

    सैनिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबत योजना

    • तारीख : 17/09/2003 -
    • क्षेत्र: शैक्षणिक

    लाभार्थी

    1. विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
    2. प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1 लाख च्या मर्यादेत असावे.
    3. प्रवेशित हा शासन मान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    सातारा सैनिक शाळा, भोसला मिलीटरी स्कुल, नाशिक व एस.एस.पी.एम.एस सैनिक शाळा, पुणे या शाळातील विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना भोजन, कपडे निवासी शिक्षण फी परिक्षा फी, क्रिडा घोडेस्वार व पॉकेट मनीसाठी संपूर्ण खर्च शासन देते. राज्यातील शासन मान्य सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विजाभज/विमाप्र विद्यार्थ्यांना प्रति विदयार्थी रु.15,000/- दरवर्षी प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग अन्यथा संबंधित सैनिक शाळेचे मुख्याध्यापक