बंद

    विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत मुलामुलींना परदेशात उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती

    • तारीख : 01/01/2019 -
    • क्षेत्र: शैक्षणिक

    लाभार्थी

    1. विदयार्थी/विदयार्थींनी हा विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवर्गातील असावा.
    2. विदयार्थ्याला परदेशातील अदयावत वर्ल्ड रँकिगमध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था/ विदयापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
    3. विद्यार्थी हा पुर्णवेळ अभ्यास क्रमासाठी प्रवेशित असावा.
    4. विदयार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
    5. परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 55% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.

    लाभ

    राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील निवड झालेल्या 75 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी खालील लाभ दिले जातात:-

    1. परदेशातील शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी,
    2. विद्यार्थ्यांस वार्षिक निर्वाह भत्ता भारत सरकारच्या डीओपीटी विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या म्हणजेच इतर देशासाठी (यु.के. वगळून) 15400 यु.एस. डॉलर तर यु.के.साठी 9900 जी.बी.पी.इतका अदा करण्यात येईल.
    3. विदयार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जवळच्या मार्गाच(शॉर्टेस्ट रूट) दराचा इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर.
    4. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग क्र. सान्यावि 2024/प्र.क्र.77/बांधकामे, दि. 25.07.2024 अन्वये दरवर्षी यु.एस.ए. व इतर देशांसाठी (यु. के. वगळून) १५०० युएस डॉलर, आणि यु.के. साठी ११०० जीबीपी इतका आकस्मिक खर्च देण्यात येईल.

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे