इ. 1 ली ते इ. 10 वी मध्ये शिकणाऱ्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांसाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क प्रदार करणे.
लाभ:
- संबंधित विद्यार्थी हा मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असलेला असावा.
- तो विजाभज, विमाप्र या प्रवर्गातील नमूद केलेल्या जातीचा असावा.
- विद्यार्थ्यांचे वय, उत्पन्न विचारात न घेता या योजनांतर्गत सर्व स्तरांवरील मान्यताप्राप्त अभ्यासक्रमांसाठी अशा शुल्क माफी देय आहेत.
लाभार्थी:
या योजनेंतर्गत संबंधित शाळांना जी फी अनुज्ञेय आहे, ती म्हणजेच प्रवेश शुल्क, वाचनालय, क्रीडा, प्रयोगशाळा अशा स्वरूपाच्या फी संबंधित शाळांना परस्पर अदा केली जाते. तसेच एक वेळ नापास झालेल्या विद्यार्थ्यांना देखील या शुल्काची प्रतिपूर्ती केली जाते.
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्हयाचे सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण विभाग व संबंधित शाळेचे मुख्याध्यापक