कुक्कुट पक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी अर्थसहाय्य योजना
योजनेचा प्रकार
धनगर समाज योजना
लाभार्थी
- लाभार्थी हा भटक्या जमाती (क) या धनगर व त्तत्सम जमाती प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व १८ ते ६० या वयोगटातील असावा.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात येतो.
- परसातील कुक्कुटपालनासाठी निवडलेल्या लाभार्थ्याकडे स्वतःची पुरेशी जागा असावी.
- लाभार्थी निवडताना भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीतील ३० टक्के महिला व ३ टक्के दिव्यांग लाभार्थ्यांना या योजनेअंतर्गत प्राधान्य देण्यात येते.
- प्रत्येक जिल्ह्यामधील भटक्या जमाती (क) या प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीच्या १,००० लाभार्थी (मुंबई शहर , मुंबई उपनगर जिल्हे वगळून)
लाभ
निवड झालेल्या प्रत्येक लाभार्थ्यास चार आठवडे वयाच्या सुधारीत देशी प्रजातीच्या (CARI Approved Low Input Technology Birds) १०० मिश्र कुक्कुट पक्ष्यांचा पुरवठा करण्यात येतो.
निवड झालेल्या लाभार्थ्यांना प्रती पक्षी २.० कि. ग्रॅ. याप्रमाणे २०० कि. ग्रॅ. या मर्यादेत कुक्कुट पक्षी खाद्याचा पुरवठा करण्यात येतो .
यासाठी सर्व लाभार्थ्यांना प्रकल्प किंमतीच्या ७५ टक्के शासकीय अनुदान अनुज्ञेय राहील. उर्वरित २५ टक्के हिस्सा लाभार्थ्याने स्वतः उभारावयाचा आहे.
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
संबंधित जिल्ह्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त