बंद

    भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता जागा खरेदी करण्यासाठी अनुदान

    • तारीख : 01/01/2020 -

    धनगर समाज योजना

    लाभार्थी

    1. राज्यस्तरीय योजनेंतर्गत राज्यातील मुंबई व मुंबई उपनगर हे २ जिल्हे वगळता उर्वरीत ३४ ग्रामीण जिल्ह्यात राज्य शासनाने वेळोवेळी अधिसूचीत केलेल्या केवळ भटक्या जमाती (भज-क) या मागास प्रवर्गातील धनगर व तत्सम समाजामधील भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी सन २०१९-२० या वित्तीय वर्षापासून या योजनेचा लाभ देण्यात येतो.
    2. उक्त मागास प्रवर्गातील ज्या मेंढपाळ कुटूंबाच्या मालकी हक्काची महाराष्ट्र राज्यात कोणत्याही ठिकाणी, कोणत्याही प्रकारची शेतजमीन नाही, अशा भूमीहीन मेंढपाळ कुटूंबातील कोणत्याही एका सदस्यास (पुरुष किंवा त्री) या योजनेंतर्गत लाभ देण्यात येतो.

    लाभ

    या योजनेंतर्गत भूमीहीन मेंढपाळ कुटुंबासाठी अर्ध बंदिस्त, बंदिस्त मेंढीपालन करण्याकरीता किमान १ गुंठा जागा खरेदी करण्यासाठी, जागेच्या किंमतीच्या ७५ टक्के अथवा किमान ३० वर्षासाठी भाडेकरारावर जागा घेण्यासाठी भाड्यापोटी द्यावयाच्या रकमेच्या ७५ टक्के रक्कम एकवेळचे एकरकमी अर्थसहाय्य म्हणून कमाल रु. ५००००/- मर्यादेत अनुदान देण्यात येते

    लाभार्थी:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    फायदे:

    वर नमूद केल्याप्रमाणे

    अर्ज कसा करावा

    संबंधित जिल्ह्याचे पशुधन विकास अधिकारी तसेच जिल्हा पशुसंवर्धन आयुक्त