मोदी आवास घरकुल योजना
योजनेचा प्रकार
: घरकुल योजना
लाभार्थी
- लाभार्थी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील असावा,
- लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु.1.20 लाखापेक्षा कमी असल्याचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले उत्पन्नाचे प्रमाणपत्र,
- स्वत:ची अथवा शासनाने दिलेली जमीन असणे आवश्यक आहे,
- महाराष्ट्र राज्यातील वास्तव्याबाबतचे अधिवास प्रमाणपत्र,
- कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीने महाराष्ट्र राज्यात इतर कोणत्याही ठिकाणी घरकुल योजनेचा लाभ घेतला नसावा.
लाभ
- या योजनेंतर्गत सर्वसाधारण क्षेत्रासाठी प्रति घरकुल रु.1.20 लक्ष व डोंगराळ/दुर्गम भागासाठी प्रति घरकुल रु.1.30 लक्ष निधी लाभार्थ्यांना उपलब्ध करुन दिला जातो.
- सदरहू योजनेंतर्गत घरकुलासाठी पात्र लाभार्थ्यांमध्ये पुढील घटकांना प्राधान्य देण्यात येते-
- घरात कोणीही कमवत नाही अशा विधवा / परितक्त्या महिला,
- पुरग्रस्त क्षेत्रातील लाभार्थी अथवा पिडीत लाभार्थी,
- जातीय दंगलीत घराचे नुकसान झालेले,
- दिव्यांग किमान 5 टक्के राखीव,
लाभार्थी:
वर नमूद केल्याप्रमाणे
फायदे:
वर नमूद केल्याप्रमाणे
अर्ज कसा करावा
वरील विभागाशी संपर्क साधा