प्रस्तावना
विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासप्रवर्ग यांच्या आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकासासाठी असलेल्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी दिनांक 9 मार्च, 2017 रोजीच्या अधिसूचनेन्वये इतर मागास बहुजन कल्याण या स्वतंत्र विभागाची निर्मिती करण्यात आलेली आहे.
या नवीन प्रशासकीय विभागांतर्गत खालील आस्थापना कार्यरत आहेत:-
1. इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, पुणे,
2. महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई
3. वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्यादीत), मुंबई
4. महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती), नागपूर
5. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), मुंबई
6. महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग, पुणे.