व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामधील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

व्यवसायिक पाठयक्रमाशी संलग्न असलेल्या वसतिगृहामधील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र जमातीच्या विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता योजना

शासन निर्णय क्रमांक : इमाव 2003/प्र.क्र.202/मावक-3,दिनांक18 जुलै, 2003

योजनेचा उद्देश :

विमुक्त जाती, भटक्या जमाती व विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींचे शिक्षण पुर्ण करण्यासाठी सहाय्यभूत व्हावी म्हणून लागू करणे.

योजनेच्या अटी :-

  1. विद्यार्थी हा विमुक्त जाती, भटक्या जमाती / विमाप्र प्रवर्गाचा असावा.
  2. विद्यार्थी हा भारत सरकार शिष्यवृत्ती धारक असावा.
  3. विद्यार्थ्यांने संबंधित व्यवसायिक पाठयक्रमाच्या महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या वसतिगृहात प्रवेश घेतलेला असावा.
  4. विद्यार्थी हा वैद्यकीय, अभियांत्रिकी, पशुधन या अभ्यासक्रमांचा पदवी / पदव्युत्तर शिक्षण नियमित घेणारा असावा.

लाभाचे स्वरुप :-

अर्ज विहित नमुन्यात मिळण्याचे ठिकाण (विनामूल्य अथवा अर्जाची किंमत) ई-स्कॉलरशिप संकेत स्थळ- www.mahadbtmahait.gov वेबसाईटवर नि:शुल्क

संपर्क-

  1. संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/सेवा पुरविणारी अधिकारी, कर्मचारी
  2. संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

तक्रार निवारण स्वरुप-

  1. अर्ज निश्चित कालावधीत निकाली न काढल्यास तक्रार करावयाच्या प्राधिकाऱ्यांचे पदनाम
  2. संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण
Back to Top