शासन निर्णय क्रमांक. धवगृ-२०१९/प्र.क्र.१२६/मावक/दि.६ सप्टेंबर, २०१९.(405 KB)
योजनेचे उद्दिष्ट
भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विदयार्थी निवासी व शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहु नये याकरिता उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.
योजनेच्या अटी:-
- विदयार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा.
- सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
- पालकाचे वार्षिक उत्पन्न कमाल रू. 2.50.00 लाख पेक्षा जास्त नसावे.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
- विदयार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्टीयकृत बॅंक खात्याशी संलग्न करणे आवश्यक .
लाभाचे स्वरुप :-
वस्तीगृहामध्ये मोफत निवास,भोजन ,शैक्षणिक साहित्य ,आरोग्य इत्यादी सोयीसुविधायुक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल.
संपर्क :-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण .