शासन निर्णय क्रमांक:शिवृत्ती-२०१८/प्र.क्र.११८/शिक्षण, दि. ११ ऑक्टोबर, २०१८. (304 KB)
योजनेचा उद्देश :
- विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील गुणवंत विदयार्थी/विदयार्थींनी आर्थि क परिस्थितीमुळे परदेशातील नामांकित शिक्षण विदयापीठामध्ये उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून गुणवंत मुलामुलींची शैक्षणिक प्रगती करणे व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे.
योजनेच्या अटी :-
- विदयार्थी/विदयार्थींनी हा विमुक्त जाती व भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गातील प्रवर्गातील असावा.
- विदयार्थ्याला परदेशातील THE/QS अदयावत वर्ल्ड रँकिगमध्ये 200 च्या आत असलेल्या शैक्षणिक संस्था/ विदयापीठामध्ये गुणवत्तेनुसार प्रवेश मिळालेला असावा.
- विद्यार्थी हा पुर्णवेळ अभ्यास क्रमासाठी प्रवेशित असावा.
- विदयार्थ्यांच्या पालकांचे/कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त नसावे.
- परदेशातील पदव्युत्तर पदवी किंवा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतलेल्या विदयार्थ्याने भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठांमधून किमान 60% गुणांसहित पदवी परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी.
लाभाचे स्वरुप :-
राज्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील निवड झालेल्या 10 गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशातील उच्च शिक्षणासाठी खालील लाभ दिले जातात:-
- परदेशातील शैक्षणिक संस्थेने शैक्षणिक कालावधीसाठी लागू केलेली संपूर्ण शिक्षण फी,
- प्रवेश घेतलेल्या संबधित शैक्षणिक संस्थेने ठरवून दिलेल्या अथवा भारत सरकारच्या DOPT विभागाने विदेशी शिष्यवृत्तीसाठी ठरवून दिलेल्या दराप्रमाणे येणारा खर्च अथवा महाराष्ट्र शासन वेळोवेळी या प्रयोजनासाठी जाहीर करेल ती रक्कम निर्वाह भत्ता,
- विदयार्थ्यास परदेशातील विद्यापीठामध्ये प्रवेश घेण्यासाठी व अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर भारतात परत येण्यासाठी भारत सरकारच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे जवळच्या मार्गाचा (shortest route) दराचा इकॉनॉमी क्लासचा विमान प्रवासाचा दर
संपर्क :-
1. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे