शासन निर्णय क्रमांक: गृनियो: २०२०/प्र.क्र.७३/विजाभज-१/दिनांक: ११ जानेवारी, २०२१.(300 KB)
शासन निर्णय क्रमांक गृनियो-2011/प्र.क्र.111/विजाभ-1, दिनांक 12 ऑगस्ट, 2014.(165 KB)
योजनेचा उद्देश:-
- विमुक्त जाती व भटक्या जमातीचा विकासाच्या मूळ प्रवाहात आणणे. त्यांचे राहणीमान उंचावे, त्यांचे उत्पन्न स्त्रोत वाढावे , त्यांना स्थिरता प्राप्त करून देणे.
- यासाठी त्यांना जमिन उपलब्ध करून तेथे वसाहत उभी करून देणे व त्या ठिकाणी त्यांना आर्थिकद्रष्टया स्वयंपूर्ण बनविणे.
योजनेच्या अटी:-
1)लाभार्थी कुटूंब हे विमुक्त जाती भटक्या जमाती या मुळ प्रवर्गातील तसेच गावोगावी भटकंती करून उपजीवीका करणारे असावे .
2)लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रू. 1.20 लक्ष पेक्षा कमी असावे.
3) लाभार्थी कुटुंबाचे स्वत:चे मालकीचे घर नसावे.
लाभाचे स्वरूप
- ग्रामीण भागामध्ये 20 कुटूंबासाठी एक वसाहत निर्माण करणे. या वसाहतीस पाणीपुरवठा, वीजपुरवठा, सेप्टींक टँकए गटारे व रस्ते अशा सुविधा पुरवणे.
- ज्या लाभार्थ्यांकडे स्वत:ची जागा आहे आणि आजपर्यंत त्याने केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही आवास योजनेचा लाभ घेतला नाही, त्यास सदर योजनेचा लाभ देता येईल.
- ग्रामीण भागात पुरेशी जागा उपलब्ध होत असल्यास सामुहिकरित्या आणि जागा उपलब्ध होत नसल्यास वैयक्तीकरित्या सदर योजना राबविण्यात यावी.
- ग्रामीण भागातील प्रत्येक जिल्हयात सदरहू समाजाच्या लाभार्थ्यांना सामुहिकरित्या अथवा वैयक्तीकरित्या सदरहू योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न करण्यात यावा.
- सदर योजनेंतर्गत वैयक्तीक लाभार्थ्यांनाही लाभ देण्यात येतो. डोंगराळ भागातील लाभार्थ्यांकरीता रू.1.30 लक्ष आणि सर्वसाधारण क्षेत्रातील लाभार्थ्यांकरीता रू.1.20 लक्ष इतके अनुदान देण्यात येते.
संपर्क:-
संबिधित जिल्हयाचे सहायक आयुक्त.