शासन निर्णय क्रमांक:- बीसीएच-1096/प्र.क्र.619/मावक-2/दि.01 एप्रिल 1998
उद्दिष्ट :-
- विजाभज/विमाप्र वर्गातील लोकांना सहकारी माध्यमातून निवास उपलब्ध करून देणे.
- विजाभज/ विमाप्र कुटुंबास स्थिरता प्राप्त करून देणे ,राहणीमान उंचावणे व समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे.
- स्वत:चे घर उभारण्यास अर्थसहाय्य देणे.
योजनेच्या अटी:
- लाभधारक हा विजाभज/विमाप्र प्रवर्गातील असावा.
- मागासवर्गीय सहकारी संस्था नोंदणीकृत असावी व कमीत कमी 11 सभासद असावे.
- योजनेचा लाभ देण्यासाठी क्षेत्राची विभागणी पुढील प्रमाणे आहे.
- वर्ग (अ) महानगरपालिका क्षेत्र आणि अव ब वर्ग नगरपालिका क्षेत्र.
- वर्ग (ब) क वर्ग नगरपालिका क्षेत्र आणि ग्रामीण क्षेत्र.
- लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न पुढील प्रमाणे,
- आर्थिक दृष्ट्या दुर्बल गट रुपये 25000/-
- अल्प उत्पन्न गट रुपये 25001 ते 50,000/-
- मध्यम उत्पन्न गट रुपये 50,00/- ते 75,000/
- उच्च उत्पन्न गट रुपये- 75,000/- पेक्षा अधिक.
लाभाचे स्वरूप:-
1.लाभधारकास शासकीय जमीन जिल्हाधिकारी यांच्याकडून विनामूल्य मिळते. जर शासकीय जमीन उपलब्ध नसेल तर संस्था खाजगी जागा विकत घेऊन त्यासाठी जमीन अनुदान म्हणून नगररचना विभागाने प्रमाणित केलेल्या मूल्यांकनाची रक्कम ग्राह्य धरली जाते. शहरी भागात 400चौ. फूट जागा व ग्रामीण भागात दोन हजार चौरस फूट जागा (दोन गुंठे) कमाल मर्यादित जमीन अनुदान मंजूर केले जाते.
2.विविध उत्पन्न मर्यादानुसार घराच्या बांधकाम खर्चाची मर्यादा रुपये 60,000/-ते 1,00,000/- गृहीत धरून त्या खर्चाच्या 30 टक्के शासकीय अनुदान,20% लाभार्थी हिस्सा व 50% बँकेचे कर्ज अनुज्ञेय होते.
संपर्क :-
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण