
शासन निर्णय क्रमांक : विभशा-२०११/प्र.क्र.१८२/विजाभज-२/दिनांक १६ मे, २०१२
योजनेचे उदिष्ट व स्वरूप :-
महाराष्ट्रातील विजाभज प्रवर्गाच्या विद्यार्थ्याना निवासी शिक्षणाचा फायदा मिळावा आणि त्यांची शैक्षणिक सामाजिक व आर्थिक उन्नती व्हावी या उदेशाने सन-1953 पासून आश्रमशाळा योजना अंमलात आणली. तथापि विजाभज प्रवर्गातील होतकरु व हुशार गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यासाठी स्वतंत्र विद्यानिकेतन योजना सन 1996 मध्ये विमुक्त जाती सेवा समिती वसंतनगर कोटग्याळ, ता.मुखेड जि.नांदेड या स्वयंसेवी संस्थेस विद्यानिकेतन सुरू करण्यास मंजूरी देण्यात आली. सध्या कार्यरत असलेल्या विद्यानिकेतन मध्ये इयता 5वी ते 12वी पर्यंत वर्ग सुरू असून 640 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. यासाठी सदर संस्थेस विद्यार्थी भोजनावर दरडोई दरमहा खर्च रु.1500/- विद्यार्थी क्रमिक पुस्तके, गणवेश, स्टेशनरी इ. साठी दरडोई रु.1450/- तसेच विद्यार्थ्यांना आंथरुन पांघरुन व कॉट्स, दैनंदिन स्वच्छता व दुरुस्ती खर्चासाठी दरडोई रु.1000/- इतके अनुदान तेस शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी वेतन अनुदान व इमारत भाडे अनुज्ञेय आहे. यासाठी होणाऱ्या वार्षिक खर्चाच्या 10% खर्च संस्थेने उचलावयाचा आहे.
योजनेच्या अटी व शर्ती :-
1)लाभधारक विद्यार्थी विजाभज प्रवर्गातील असावा.
2)पालकांचे वार्षीक उत्पन्न 24000 पेक्षा जास्त नसावे.
3)सदर विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षा देवून गुणवत्तेनुसार प्रवेश मिळेल.
4)सदर विद्यानिकेतन मध्ये फक्त विजाभज संचालनालया मार्फत अनुदानित प्राथमिक आश्रमशाळा इ.4 थी मध्ये शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांना इयत्ता 5 वी मध्ये प्रवेश परीक्षेतील गुणवत्ते नुसार प्रवेश दिला जातो.
योजनेची उपयुक्तता :
गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे व त्यांनी उच्च शिक्षणासाठी प्रवृत्त व्हावे म्हणून ही योजना उपयुक्त आहे.