शासन निर्णय क्रमांक: मोवाप्र-२०१८/प्र.क्र.९३/विजाभज-१/दि. ११ ऑक्टोबर, २०१८. (527 KB)
शासन निर्णय क्र. मोवाप्र-२०१६/प्र.क्र.१३५/शिक्षण-१/दि.९ नोंव्हेबर, २०१७. (1.37 MB)
शासन निर्णय क्र. मोवाप्र-२०१३/प्र.क्र.२९४/शिक्षण-१/दि.२९ जानेवारी, २०१६. (285 KB)
योजनेचा उद्देश:-
- विजाभज इमाव व विमाप्र बेरोजगार युवक-युवतींना प्रशिक्षणाद्वारे स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देणे .
- स्वतःच्या पायावर उभे राहून आर्थिक व सामाजिक स्थिरता मिळवून देणे समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले .
योजनेच्या अटी:-
1)युवक /युवती हा विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील असावा
2) शैक्षणिक पात्रता व वयोमर्यादा परिवहन अधिनियमातील तरतुदीनुसार असावी .
3) शासन सामाजिक न्याय विभागाने निश्चित केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेमार्फत प्रशिक्षण घेणे अनिवार्य.
लाभाचे स्वरूप :-
1) वर नमूद प्रशिक्षण प्रकारात दरानुसार शासनाने नियुक्त केलेल्या प्रशिक्षण देणाऱ्या स्वयंसेवी संस्थेस प्रति प्रशिक्षणार्थी रक्कम अदा करण्यात येते .
2) प्रशिक्षण कालावधी मध्ये जिल्हा कार्यालय ते प्रशिक्षण केंद्रापर्यंत जाण्या-येण्याचे भाडे आरोग्य तपासणी छायाचित्र चालकाचा कच्चा व पक्का परवाना व बिल्ला राहण्याची व जेवणाची व्यवस्था इत्यादी प्रशिक्षण संस्थेमार्फत पुरवण्यात येते.
संपर्क:-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त