शासन निर्णय, क्रमांक-पुरस्कार 2018/प्र.क्र.179/शिक्षण, दिनांक 30 जानेवारी, 2019. (3.73 MB)
शासन निर्णय, क्रमांक-संकीर्ण 2013/प्र.क्र.65/विजाभज-1, दिनांक 4 मार्च, 2017. (134 KB)
योजनेचा उद्देश :
- विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील मुला-मुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणे,
- त्यांची शैक्षणिक प्रगती करणे व उच्च शिक्षणासाठी प्रोत्साहित करणे
योजनेच्या अटी :-
- विदयार्थी/विदयार्थींनी हा विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातील असावा.
- विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेमध्ये राज्यात /विभागात सर्वप्रथम आलेला असावा.
लाभाचे स्वरुप :-
- राज्यातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत विमुक्त जाती / भटक्या जमाती प्रवर्गातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीला प्रत्येकी रु.1.00 लाख, स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र
- विभागातून माध्यमिक व उच्च माध्यमिक परिक्षा मंडळाच्या इयत्ता 10 वी व 12 वी परिक्षेत विमुक्त जाती व भटक्या जमाती प्रवर्गातून सर्वप्रथम आलेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनीला प्रत्येकी रु.51 हजार, स्मृति चिन्ह व प्रमाणपत्र
संपर्क :-
1. संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे