सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना

सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत इतर मागास प्रवर्गातील इयत्ता 5 वी 7 वी मध्ये शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती योजना

शासन निर्णय क्रमांक: शिवृत्ती: २०१८/प्र.क्र.२८३/शिक्षण, ३० जानेवारी, २०१९. PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (3.2 MB)

योजनेचा उद्देश :

  1. मुलींमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हावी,
  2. मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे,
  3. शिक्षणामधील मुलींच्या गळतीचे प्रमाण कमी व्हावे.
  4. शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य व्हावे.

योजनेच्या अटी :-

  1. विद्यार्थींनी विजाभज / विमाप्र/ इतर मागास प्रवर्गातील असावी.
  2. इयत्ता 5 वी ते 7 वी मध्ये शिक्षण घेणारी असावी.
  3. उत्पन्नाची अट लागू नाही.
  4. मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असावी.

लाभाचे स्वरुप :-

  1. इयत्ता 5 वी ते 7 वी मधील विजाभज / विमाप्र/ इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थींनींना प्रतिमहा रुपये 60/- प्रमाणे  10 महिन्यासाठी रुपये 600/- शिष्यवृत्ती देण्यात येते.

संपर्क :-

1. संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

2. समाजकल्याण अधिकारी वर्ग-2, बृहन्मुंबई

3. संबंधित विदयालयाचे मुख्याध्यापक

Back to Top