सैनिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबत योजना

सैनिक शाळेत शिकणाऱ्या विजाभज, विमाप्र विद्यार्थ्यांना निर्वाह भत्ता देण्याबाबत योजना

शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय,मुंबई, क्रमांक-संकीर्ण 2002/ प्र.क्र.371/मावक-3, दिनांक 5  ऑगस्ट,2003. PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (41.3 KB)

शासन निर्णय, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय,मुंबई,क्रमांक-इबीसी 1074/56423/डी-5, दिनांक 6 ऑगस्ट,1976

योजनेचा उद्देश :

  1. विजाभज व विमाप्र वर्गाच्या विद्यार्थ्यांना सैनिक शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणे.
  2. सैनिक प्रशिक्षण घेऊन पोलीस व सैन्य भरतीत नोकरीची संधी उपलब्ध करुन देणे.
  3. विद्यार्थ्यांना शैक्षणिक बाबींसाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करुन देणे.

योजनेच्या अटी :-

  1. विद्यार्थी हा विमुक्त जाती / भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील असावा.
  2. प्रवेशिताच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न रुपये 1  लाख च्या मर्यादेत असावे.
  3. प्रवेशित हा शासनमान्य शिक्षण संस्थेत शिक्षण घेत असला पाहिजे.

लाभाचे स्वरुप :-

  1. राज्यातील शासन मान्य सैनिक शाळांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विजाभज/विमाप्र विद्यार्थ्यांना प्रति विदयार्थी रु.15,000/- प्रमाणे निर्वाह भत्ता देण्यात येतो.

संपर्क :-

1. संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

2. संबंधित विदयालयाचे मुख्याध्यापक

 

Back to Top