शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण-२०१७/प्र.क्र.२८/विजाभज-१/दिनांक: ८ मार्च, २०१९. (3.3 MB)
शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- 2016/प्र.क्र.467/महामंडळे,दि. 8/06/2016. (1.62 MB)
उद्दिष्ट:-
वीरशैव लिंगायत समाजासाठी सामाजिक, कलात्मक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करीत असलेल्या व्यक्तींच्या व संस्थांच्या कामाची दाद/दखल घ्यावी व इतरांना त्यापासून प्रेरणा मिळावी, जेणेकरून या समाजातील समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक सरसावून पुढे यावेत.
सामाजिक कार्याचे स्वरूप:-
या योजनेनुसार वीरशैव-लिंगायत समाजाकरिता सामाजिक, शैक्षणिक, संस्कृतीक, समाज संघटनात्मक, अध्यात्मिक प्रबोधन व आर्थिकदृष्ट्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिक तसेच सामाजिक संस्था असाव्यात.
पुरस्काराचे स्वरुप:-
वीरशैव-लिंगायत समाजासाठी कार्य करणारे समाजसेवक, कलावंत, समाज संघटनात्मक कार्यकर्ते, अध्यात्मिक प्रबोधनकार व साहित्यिकांसाठी:-
- शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह
- रु.25000/- रोख रक्कम
- एक शाल किंवा साडी खण आणि श्रीफळ
वीरशैव लिंगायत समाजासाठी कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थेसाठी:-
- शासनाने मान्यता दिलेले सन्मानपत्र
- स्मृतिचिन्ह यावर संस्थेचे नाव असेल
- रु. 51000/- रोख रक्कम
- शाल व श्रीफळ
संपर्क :-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण.