इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी च्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना

इयत्ता 11 वी व इयत्ता 12 वी च्या विजाभज व विमाप्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती योजना

शासन निर्णय: इबीसी-२००३/प्र.क्र. २०४/मावक-३/दि. २५ जूलै, २००३. PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (44.9 KB)

योजनेचा उद्देश :

  • राज्यस्तरीय योजना विजाभज/विमाप्र प्रवर्गाच्या मुला-मुलींचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, त्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ व्हावी व तसेच सर्वसाधारण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्पर्धेत ते टिकून रहावेत.

योजनेच्या अटी :-

  1. विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र प्रवर्गाचा असावा.
  2. विद्यार्थी इयत्ता 11 वी व 12 वी कनिष्ठ महाविद्यालयात शिक्षण घेणारा असावा.
  3. विद्यार्थ्यास इयत्ता 10 वी मध्ये 75 टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळणे आवश्यक आहे.
  4. ही शिष्यवृत्ती भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर गुणवत्ता शिष्यवृत्ती योजने व्यतिरिक्त असेल.

लाभाचे स्वरुप :-

  1. अर्ज विहित नमुन्यात मिळण्याचे ठिकाण (विनामूल्य अथवा अर्जाची किंमत) ई-स्कॉलरशिप संकेत स्थळ-
  2. विमुक्त जाती / भटक्या जमाती /विमाप्र विद्यार्थ्यांना 11 वी व 12 वी साठी प्रतिमहा 300 रुपये प्रमाणे दहा महिन्यांसाठी 3000 रुपये इतका लाभ देण्यात येतो.

संपर्क-

1) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/सेवा पुरविणारी अधिकारी, कर्मचारी

2)संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण

तक्रार निवारण स्वरुप-

अर्ज निश्चित कालावधीत निकाली न काढल्यास तक्रार करावयाच्या प्राधिकाऱ्यांचे पदनाम

संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण

Back to Top