शासन निर्णय क्र.इमाव-2002/प्र.क्र.414/मावक-3, दि. 31.03.2004. (457 KB)
योजनेचा उद्देश :
- इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शालांत परिक्षोत्तर शिक्षण घेणेस उद्युक्त करून त्यांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने इयत्ता अकरावी पासून ते पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी शिष्यवृत्ती शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क संबंधित विद्यार्थ्यांना अदा करणे.
योजनेच्या अटी :-
- लाभार्थी व मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा.
- लाभार्थी इतर मागास प्रवर्गातील असावा.
- पालकांची उत्पन्न मर्यादा 1.50 लाखांची असावी.
- उत्पन्नाचा दाखला, नॉन क्रिमिलेअर व जातीचे प्रमाणपत्र
- महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असल्याचे प्रमाणपत्र
- शैक्षणिक पात्रता इ.10 वी पास व पुढील शिक्षण चालू असावेत.
लाभाचे स्वरुप :-
- अर्ज विहित नमुन्यात मिळण्याचे ठिकाण (विनामूल्य अथवा अर्जाची किंमत) ई-स्कॉलरशिप संकेत स्थळ- www.mahadbtmahait.gov.in वेबसाईटवर नि:शुल्क
संपर्क-
1) संबंधित महाविद्यालयाचे प्राचार्य/सेवा पुरविणारी अधिकारी, कर्मचारी
2) संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त व सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण
तक्रार निवारण स्वरुप-
अर्ज निश्चित कालावधीत निकाली न काढल्यास तक्रार करावयाच्या प्राधिकाऱ्यांचे पदनाम
संबंधित विभागाचे प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण