भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थ्यांना संघ लोकसेवा आयोग/महाराष्ट्र लोकसेवा आयोग यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या स्पर्धापूर्व परीक्षांसाठी निवासी प्रशिक्षण देण्याबाबत योजना.

Students from Dhangar Community in School

शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०१९/प्र.क्र ०३/विजाभज-०१, दिनांक-०६ सप्टेंबर २०१९.pdf(3.1 MB)

योजनेचे उद्देश:-

1.लोकसेवांमार्फत घेण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांकरीता भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना निवासी परीक्षापूर्व प्रशिक्षण देऊन त्यांचे प्रशासकीय सेवेतील प्रमाण वाढवणे. 

2.स्पर्धा परीक्षेत भाग घेणाऱ्या युवक व युवतींना स्पर्धेस यशस्वीपणे सामोरे जाण्यासाठी  आवश्यक ती पूर्वतयारी करण्यासाठी आवश्यक ते मुलभुत प्रशिक्षण उपलष्ध करुन देणे.

3.परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा उपलब्ध करून देणे.

योजनेच्या अटी:-

1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.

2.सदर उमेदवार हा 60 टक्के गुणांसह  पदवी उत्तीर्ण असावा.

 लाभाचे स्वरुप :-

1.परीक्षा देण्यासाठी आवश्यक असणारे अभ्यास साहित्य व इतर अनुषंगिक सुविधा .

2. स्पर्धा परिक्षा पूर्वतयारीसाठी आवश्यक ते मुलभुत  निवासी प्रशिक्षण उपलष्ध

संपर्क :-

http://mahajyoti.org.in

Back to Top