शासन निर्णय क्र. कुक्कुट-२०१९/प्र.क्र.९३/पदूम-४.(3.1 MB)
योजनेचे उद्देश :-
1. पारंपारिक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला जोड देणे व लाभार्थ्याचे कौशल्य विकसित करणे.
2.कुक्कुटपक्षी व्यवस्थापनामध्ये सुधारणा करून संतुलित आहार पुरवणे तसेच कुकुटपालन व पशुसंवर्धनविषयक इतर योजना राबविणे.
3.स्वयंरोजगार उपलब्ध करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास्तव ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालनास चालना देणे.
योजनेच्या अटी:-
- योजनेचा लाभार्थी हा भटक्या जमाती - क प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व 18-60 या वयोगटातील असावा.
- एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
- परसातील कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्याकडे स्वत:ची पुरेशी जागा असावी .
संपर्क :-
ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येते.