केंद्रशासनाची सुधारीत मार्गदर्शक सूचना सप्टेंबर 2018
शासन निर्णय प्रमाणक: शिष्यवृत्ती-२०१८/प्र.क्र.४८/शिक्षण/दि. २७ मे, २०१९. (1 MB)
योजनेचा उद्देश :
- विजाभजमधील गरीब कुंटुबातील मुले पालकांच्या पारंपारीक व्यवसायामुळे नियमित शाळेत जावू शकत नाही. त्यामुळे या प्रवर्गातील गरीब कुटूंबातील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, प्रोत्साहन देणे,
- शिक्षणामधील गळतीचे प्रमाण कमी करणे,
- विदयार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे.
योजनेच्या अटी :-
- लाभार्थी शासन मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा.
- लाभार्थी विजाभज, प्रवर्गातील असावा आणि पालकांची उत्पन्न मर्यादा 2 लाखांची असावी
लाभाचे स्वरुप :-
- विजाभजमधील 1 ली ते 8 वी तील विदयार्थ्यांना प्रतिमहा रु.100/- प्रमाणे 10 महिन्यांसाठी रु.1000/-शिष्यवृत्ती दिली जाते.
- तसेच 9 वी ते 10 वी मधील विदयार्थ्यांना प्रतिमहा रु.150/- प्रमाणे 10 महिन्यांसाठी रु.1500/-शिष्यवृत्ती दिली जाते.
संपर्क :-
1. संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद
2. समाजकल्याण अधिकारी वर्ग-2, बृहन्मुंबई
3. संबंधित विदयालयाचे मुख्याध्यापक