भारत सरकारची इतर मागास प्रवर्गासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.

भारत सरकारची इतर मागास प्रवर्गासाठी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजना.

शासन निर्णय क्रमांक: शिवृत्ती-२०१८/प्र.क्र.४७/शिक्षण/दिनांक: २७ मे, २०१९. PDF file that opens in new window. To know how to open PDF file refer Help section located at bottom of the site. (161 KB)

योजनेचा उद्देश :

  1. इतर मागास प्रवर्गा मधील गरीब कुंटुबातील मुले पालकांच्या पारंपारीक व्यवसायामुळे नियमित शाळेत जावू शकत नाही. त्यामुळे या प्रवर्गातील गरीब कुटूंबातील मुलांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे, प्रोत्साहन देणे,
  1. शिक्षणामधील गळतीचे प्रमाण कमी करणे,
  2. विदयार्थ्यांना शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य मिळावे.

योजनेच्या अटी :-

  1. लाभार्थी इतर मागास प्रवर्गातील असावा.
  2. लाभार्थी शासन मान्यताप्राप्त शाळेत शिक्षण घेत असावा.
  3. उत्पनाची कमाल मर्यादा 2.50 लाख असावी.

संपर्क :-

1. संबंधित जिल्हयाचे समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद

2. समाजकल्याण अधिकारी वर्ग-2, बृहन्मुंबई

3. संबंधित विदयालयाचे मुख्याध्यापक

Back to Top