वसतिगृह योजनेपासून वंचित असलेल्या धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना आदिवासी विकास विभागाच्या स्वयं योजनेच्या धर्तीवर स्वतंत्र योजना सुरु करण्याबाबत.

A man standing with his cattle.

शासन निर्णय क्रमांक. धवगृ-२०१९/प्र.क्र.१२६/मावक/दि.६ सप्टेंबर, २०१९.pdf(405 KB)

योजनेचे उद्दिष्ट 

भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विदयार्थी निवासी व  शैक्षणिक सुविधांपासुन वंचित राहु नये याकरिता उच्च शिक्षणासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देणे.

योजनेच्या अटी:-

  1. विदयार्थी हा महाराष्ट्र  राज्याचा रहिवासी असावा.
  2. सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
  3. पालकाचे  वार्षिक उत्पन्न कमाल रू. 2.50.00 लाख पेक्षा जास्त नसावे.
  4. सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
  5. विदयार्थ्याने स्वत:चा आधार क्रमांक आपले राष्टीयकृत बॅंक खात्याशी संलग्न करणे आवश्यक .

लाभाचे स्वरुप :-

वस्तीगृहामध्ये मोफत निवास,भोजन ,शैक्षणिक साहित्य ,आरोग्य इत्यादी सोयीसुविधायुक्त निवासाची व्यवस्था करण्यात येईल.

संपर्क :-

संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त समाजकल्याण .

Back to Top