शासन निर्णय क्रमांक: सावियो- 2005/प्र.क्र.41/सुधार-1/ मुंबई, दि. 18 डिसेंबर 2018
शासन निर्णय क्रमांक:सावियो- 2003/ प्र.क्र.7/ सुधार-1, दिनांक 24 डिसेंबर 2003. (66.8 KB)
उद्दिष्ट :-
समाजातील मागासवर्गीयांचे विवाह वाढत्या महागाईत कमी खर्चात व्हावे व मागासवर्गीय कुटुंबाचा विवाहावर होणाऱ्या अनाठायी खर्चावर नियंत्रण राहावे यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्थांना प्रोत्साहन देण्यासाठी सदर योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे.
लाभाचे स्वरुप :-
1.महाराष्ट्रात अनुसूचित जाती व नवबौद्ध यांसह विमुक्त जाती भटक्या जमाती धनगर व वंजारी सह विशेष मागास प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या मागासवर्गीय कुटुंबातील सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन विवाह करणाऱ्या जोडप्यांना रू.10 हजार इतके अर्थसहाय्य वधूचे आई-वडील किंवा पालकांच्या नावे धनादेशाद्वारे विवाहाच्या दिवशी देण्यात येते.
2.सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करणाऱ्या संस्था वा संघटनांना प्रत्येक जोडपे मागे रु.2 हजार प्रोत्साहनपर अनुदान सन 2008 पासून देण्यात येते.सामूहिक विवाह सोहळ्यासाठी संस्थेने कमीत कमी 20 दांम्पत्यांचा समावेश असावा.
संपर्क:-
संबंधित जिल्ह्याचे सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभाग.