भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील मेंढपाळ कुटुंबांना पावसाळ्यात चराई करण्याकरिता जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या कालावधीसाठी अनुदान देणे.

A shepherd standing with his cattle.

शासन निर्णय क्रमांक: पविआ-१०१९/प्र. क्र.२१६/पदुम-३.pdf(434 KB)

योजनेचे उद्देश:-

  1. राज्यातील भटकंती करणाऱ्या धनगर व तत्सम समाजातील पशुपालकांना पारंपारिक पद्धतीने करीत असलेल्या मेंढी/शेळीपालन या व्यवसायापासून त्यांना शाश्वत उत्पन्नाचा स्त्रोत निर्माण करून देणे व त्याद्वारे त्यांचा सामाजिक व आर्थिक स्तर उंचावण्यासाठी मदत करणे.
  2. माहे जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये मेंढपाळ कुटुंबांना मेंढ्यांच्या चराईच्या अनुषंगाने येणाऱ्या अडीअडचणी/समस्या यावर मात करणे.
  3. राज्यातील मेंढ्यांच्या संख्येमध्ये सातत्याने होत असलेली घट थांबविणे किंबहुना त्यावर वाढ करून स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
  4. राज्यातील मेंढी/शेळीपालन व्यवसायास चालना देऊन ग्रामीण रोजगार निर्मिती करणे

योजनेच्या अटी:-

1. लाभार्थी हा भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील विद्यार्थी असावा.

संपर्क:-

ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येईल.

Back to Top