भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजातील लोकांना ग्रामीण परिसरातील कुकुटपालन संकल्पनेअंतर्गत धनगर समाजातील कुटुंबीयांना ७५ टक्के अनुदानावर चार आठवडे वयाच्या सुधारित देशी प्रजातीच्या १०० कुकुटपक्षांच्या खरेदी व संगोपनासाठी सहाय्य करणे.

A shepherd is standing with his cattle

शासन निर्णय क्र. कुक्कुट-२०१९/प्र.क्र.९३/पदूम-४.pdf(3.1 MB)

योजनेचे उद्देश :-

1. पारंपारिक कुक्कुटपालनाच्या व्यवसायाला जोड देणे व लाभार्थ्याचे  कौशल्य विकसित करणे.

2.कुक्कुटपक्षी व्यवस्थापनामध्ये सुधारणा करून संतुलित आहार पुरवणे तसेच कुकुटपालन व पशुसंवर्धनविषयक इतर योजना राबविणे.

3.स्वयंरोजगार उपलब्ध करून कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यास्तव ग्रामीण परिसरातील कुक्कुटपालनास चालना देणे.

योजनेच्या अटी:-

  1. योजनेचा लाभार्थी हा भटक्या जमाती - क प्रवर्गातील जात प्रमाणपत्र धारण करणारा व 18-60 या वयोगटातील असावा.
  2. एका कुटुंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ देण्यात यावा.
  3. परसातील कुक्कुटपालनासाठी लाभार्थ्याकडे स्वत:ची पुरेशी जागा असावी .

संपर्क :-

ही योजना पशुसंवर्धन विभागामार्फत राबविण्यात येते.

Back to Top