
शासन निर्णय क्रमांक: धइशाप्र: २०१९/प्र.क्र.७२/शिक्षण/दि. २९ जानेवारी, २०२०.(3.3 MB)
धाराशाप्र.-२०१९/प्र.क्र.७२/शिक्षण दिनिक-५ सप्टेंबर, २०१९.(742 KB)
योजनेचे उद्देश :-
- धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षणाच्या बाबतीत मागे राहू नये.
- उच्च शिक्षणाच्या अभ्यासक्रमासाठी इंग्रजी माध्यमाचा वापर होत असल्यामुळे धनगर समाजाच्या विदयार्थ्यांना बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेणे शक्य व्हावे याकरिता शहरातील इंग्रजी माध्यमांच्या नामांकित निवासी शाळांमध्ये शिक्षण देणे.
योजनेच्या अटी:-
- सदर योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारा विदयार्थी धनगर समाजातील असावा.
- कुटुंबाच्या वार्षिक उत्पन्नाची कमाल मर्यादा रू. 1.00 लाख इतकी असावी.
- सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले धनगर समाजाचे जातप्रमाणपत्र असावे.
लाभाचे स्वरुप :-
रेनकोट, भोजन, निवास खर्च, टयुशन फी, सुरक्षा अनामत, शिक्षण शुल्क, तसेच विद्यार्थ्यांना आवश्यक ते साहित्य पुरवले जाईल.
संपर्क:-
संबंधित जिल्हयाचे सहायक आयुक्त .